Sunday, April 17, 2022

हदगाव नगर पालिकेचे जे.ई.शेख यांचा प्रताप. बोगस कामाचे काढले सहालाख बिल.नगरसेविका अरूणा काळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निलंबित करण्याची मागणी.

हदगाव (प्रतिनिधी) भगवान कदम नगरपालिकेचा कारभार  नेहमी चर्चेत असलेले कर्मचारी आणि बोगस, भ्रष्ट प्रथम प्रवृत्तीला थारा देत आहेत.  कुठल्याही राजकीय नेत्याचा अंकुश नसल्यासारखं वागणारे भ्रष्टाचारी इंजिनियर अमीर शेख यांनी दलित वस्तीच्या बोगस कामाचे सहा लाख रुपयांचे बिल काढून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली .आम्हाला पैसे द्या आणि कसेही काम करा अशा तोऱ्यात असलेले हा कर्मचारी निकृष्ट काम करणाऱ्या करोडो रुपयाच्या बोगस कामाला सहकार्य करत गुत्तेदाराच्या  घशात टाकित आहे. करोडो रुपयांची बोगस कामे यांच्याच  काळात झाली आहे त. 
आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी होणे अपेक्षित आहे हादगाव समाज मंदिर परिसरामध्ये सिंगण कर बाई यांच्या घरापासून ते कोथळा रोड  पर्यंत नाली कव्हर चे काम केले असून ठेकेदारांनी सदरील काम चुरी, डस्ट  मध्ये करून तिचे बेशरमांची लाकडे पाटी म्हणून वापर  करून,गज 6 mmचा वापर केला, दीड फुटावर गजबांधणी करून काम केलेले आहे. सदरील काम बोगस असल्याची तक्रार नगरसेविका अरुण गुणवंत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती सदरील कार्य कामाची चौकशी करा अशा पद्धतीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही तीन टक्के रक्कम घेऊन त्यांनी सदरील बिल अदा केले आहे.  नगरसेविका अरुणा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदरील   इंजिनिअर निलंबनाची कारवाई करा अन्यथा धरणे आंदोलन करू असा इशाराही दिला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून थर्ड पार्टी नगरसेवकांच्या समक्ष ऑडिट करावा आणि त्यानंतरच बिल काढावी अशा पद्धतीचे पत्र देऊनही पैशाची देवाणघेवाण करून गुत्तेदाराकडुन  पैसे घेऊन सदरील  बिल अदा केले यासारखे अनेक कामे बोगस कामे करण्याचा सपाटा लावला आहे. त्त्याच्याकडे रमाई सारख्या घरकुलाची योजना असूनही अर्धवट राहिलेल्या घरकुलांचे पैसा आधार न करणे मागासवर्गीयांना त्यांना चकरा  मारायला लावुन ‌‌त्रास देत आहे. वेळेवर हजर न जाणे ,ऑफिसमध्ये पैशाचे देवाण-घेवाण करणे अशा भ्रष्ट कर्मचार्यावर कुणाचेही अंकुश नसुन बिनधास्त भ्रष्टाचार करित आहे.सदरिल इंजिनियर अमीर शेख यांना   तात्काळ निलंबित करा तसेच अदा केलेली 600000/-लाख त्यांच्या कडून वसुल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी नगरसेविका अरुणा काळे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली   आहे.

No comments:

Post a Comment