अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी प्रत्यक्ष कामकाज सुरू असतानाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या थेट आदेशानुसार बीडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाने न्यायालयात हजर राहून या कारवाईची अंमलबजावणी केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे विधि व प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
१५ वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी ताज्या
विशेष म्हणजे, ज्या दालनात डॉ. तेहरा यांच्यावर ही कारवाई झाली, त्याच कक्षात सुमारे १५ वर्षांपूर्वी एका तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना अशाच प्रकारे सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले होते. एकाच न्यायालयात आणि एकाच कक्षात या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने वकील व कर्मचारी वर्गात दिवसभर याच विषयाची जोरदार चर्चा सुरू होती.
No comments:
Post a Comment