बीड (प्रतिनिधी) पेठ बीड पोलीस निरीक्षकपदी निलेश केळे यांची नियुक्ती झाल्यापासून पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत मटका, गुटखा,जुगार,गांजा,चक्री अवैध दारू यासह इतर अवैध धंद्यावर धडक कारवाया सुरु आहेत तसेच मागील गुन्ह्याची उकल व फरार आरोपीला जेरबंद करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
घरफोडीच्या गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपीला पेठ बीड पोलिसांच्या डी.बी. पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. सिकंदर अख्तर सय्यद (वय ४५, रा. मोहमदिया कॉलनी, पेठ बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली
महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्ह्यांची नोंद.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बीड वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश केळे, पोउपनि. मुन्सर शहा, पोहेकॉ. नितीन राठोड, पोलीस अंमलदार विष्णू गुजर, पांडुरंग परजणे आणि औदुंबर गिरी यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ.भालेराव करीत आहेत.
No comments:
Post a Comment