बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात पूर्ववैमनस्यातून उघड्यावर दहशत निर्माण करणे आणि प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांना शिवाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. बेड्या ठोकल्यानंतर शुक्रवारी गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी पाचही मुख्य आरोपींना घटनास्थळी आणून त्यांची परिसरात भररस्त्यात धिंड काढली.
१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी शेती खरेदीचा वाद आणि जुन्या वैमनस्यातून एका गटाने दुसऱ्या गटावर माने कॉम्प्लेक्स व मॅजिक सलूनसमोर घातक शस्त्रांसह प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार सचिन आगलावे आणि बाळू राहाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता दुचाकीवरून पाठलाग करत आरोपींना 'राष्ट्रवादी भवन' जवळ गाठले. इतर पोलीस पथकाने तातडीने धाव घेत शस्त्राधारी आरोपींना 'महिंद्रा थार' गाडीसह जागीच ताब्यात घेतले.
शुक्रवारी तपासाचा भाग म्हणून आणि गुन्ह्याची पुनर्रचना करण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींना माने कॉम्प्लेक्स परिसरात आणले. यावेळी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकलेल्या अवस्थेत पायी चालवत पूर्ण परिसरात फिरवले. गुंडगिरी आणि दहशत पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच जणू शिवाजीनगर पोलिसांनी या कारवाईतून दिला. ही धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी
अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाबू उर्फ मिनीनाथ सहादेव जाधव, हनुमान सहादेव जाधव, संभाजी संतराम जाधव, यशराज रामा जाधव आणि सागर गंगाराम जाधव (सर्व रा. वायभट वाडी, ता. जि. बीड) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल असून, फरार इतर ८ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली
'थार' गाडी जप्त, सीसीटीव्ही मुख्य पुरावा
गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची महिंद्रा थार गाडी (एमएच २३ बीएस ०८०८) आणि इतर वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनेचे प्रत्यक्षदर्शी, परिसरातील 3 सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांनी मोबाइलमध्ये काढलेले व्हिडिओ हे तपासात भक्कम पुरावे ठरले आहेत
No comments:
Post a Comment