Thursday, September 24, 2026

हालगे गल्ली ३३ वर्षांची परंपरा!मिरवणुकी ऐवजी नवचैतन्य गणेश मंडळाचा भव्य महाप्रसाद.

*आज ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे कीर्तन; उद्या हजारो भाविकांना महाप्रसाद

परळी वैजनाथ | (प्रतिनिधी)  परळी शहरातील हालगे गल्ली येथील नवचैतन्य गणेश मंडळाच्या वतीने गेल्या ३३ वर्षांपासून गणेशोत्सवात मिरवणूक न काढता विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यानिमित्त गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भागवताचार्य श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
श्रीधाम वृंदावन गौरक्षक सेना व सनातन रक्षक सेना फाउंडेशनचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष असलेले ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी भव्य-दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असून, दरवर्षी या महाप्रसादाचा सुमारे दहा हजार भाविक लाभ घेतात.
गणेशोत्सवात अनावश्यक खर्च व मिरवणुकीऐवजी गेल्या ३३ वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या नवचैतन्य गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरासह पंचक्रोशीत कौतुक होत आहे. विशेष म्हणजे हालगे गल्लीतील सर्व युवक एकत्र येऊन हा उपक्रम उत्साहाने राबवितात.
कीर्तन व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवचैतन्य गणेश मंडळ, हालगे गल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment