Monday, March 28, 2022

पोलीस सह्ययक निरीक्षक (PSI) पदी निवड झाल्या बद्दल कृष्णा कावळे यांचा परचुंडी येथे सत्कार संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  पोलीस सह्ययक निरीक्षक (PSI) , पदी कृष्णा कावळे यांची नुकतीच निवड झाली असून त्याचा परचुंडी येथे भव्य सत्कार नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, श्री अरविंद बेल्लाळे,श्री रत्नाकर देवकते सार्वजनिक बांधकाम विभाग परळी,महेश घेवारे कृषी सह्ययक सोनपेठ,आदर्श शिक्षक अशोक नावंदे,विक्रीकर अधिकारी समाधान रुपनर,मा सरपंच बाबासाहेब रुपनर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, आदर्श शिक्षक अशोक नावंदे, विक्रीकर अधिकारी समाधान रुपनर यांनी मनोगत व्यक्त केले तर कृष्णा कावळे यांनी सत्काराला उत्तर देताना उपस्थित सर्वांना अनुभव कथन केला .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाब रुपनर, अजय गडदे, रवी रूनर,अनंत रुपनर ,हरिदास रुपनर यांचेसह तरुण मंडळींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment