👉🏻मुरूम नसल्याचे कारण दाखून काम बंद...
हिमायतनगर (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तिन वर्षापासून अतिशय कासव गतीने चालू असून रस्ता खोदकाम करूण अर्धवट अवस्थेत ठेवून कंत्राटदाराने प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ चालूच ठेवला आहे. या बाबींची गंभीर दखल घेत तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वारंवार कंत्राटदार व संबंधित यंत्रणेला वारंवार तोंडी,लेखी सुचना दिल्या, परंतू कंत्राटदाराने आपलाच हेका चालवित आम्हाला मुरूम उपलब्ध करून द्या असे म्हणत काम अर्धवट अवस्थेत ठेवले असल्याने प्रवाश्यांना अतिशय जिव मुठीत धरून या रस्त्यावरून येजा करावी लागत आहे. आमदार जवळगावकर यांनी झोपलेल्या यंत्रणेला जागी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतू आमदार जवळगावकर यांच्या आंदोलनानंतरही काम थांबूनच असून एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु. ते कौठा ता किनवट अंतर्गत महामार्ग रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून गेल्या तिन साडेतीन वर्षापासून या अंतर्गत रस्त्यांचे काम ठेकेदाराकडून अतिशय कासव गतीने सुरू आहे. हिमायतनगर रेल्वेगेट ते शहरा अंतर्गत रस्ता नुसताच खोदकाम करून ठेवला आहे. खोदकाम करून अर्धवट अवस्थेत रस्ता असल्याने धुळीचे साम्राज्य पसरले असून किरकोळ अपघात नित्याचेच बनले असून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही धोक्याची घंटा ओळखून तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी संबंधित ठेकेदार भाईजी यांना वेळोवेळी तोंडी सुचना देवून पाहिल्या परंतू या कामाचे ठेकेदार यांनी आमदार जवळगावकर यांच्या सुचनेला केराची टोपली दाखवत आपलाच हेका चालू ठेवला, पर्यायाने आमदार माधवराव पाटील जवळगावकर आक्रमक झाले. जनहितार्थ आमदार जवळगावकर यांनी थेट संबंधित विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेवून लेखी निवेदन सादर केले सातत्यानं पाठपुरावा करून ही ठेकेदार गेंड्याची कातडी ओढवून बसला असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे अतिशय आक्रमक होऊन रास्ता रोकोचे आंदोलनाचे हत्यार उपसले. आठवडा भरापुर्वी आमदार जवळगावकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह जवळपास दोन तास किनवट नांदेड महामार्ग रस्ता अडवून धरून रास्ता रोको आंदोलन केले. तेव्हा संबंधित विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता त्र्यंबक पारीख यांच्यासह ठेकेदाराचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी हजर होवून एका महिन्यात काम पुर्ण करण्याचे आश्वासन संबंध जनतेसमोर आमदार जवळगावकर यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनांच्या दुसर्या दिवशी थोडेफार मुरूम अंथरण्याचे काम केले, त्या दुसर्या दिवसांपासून संबंधित ठिकाणच्या कामावरील यंत्रणा गायब झाली. धुळीचे लोट प्रवाश्यांच्या जिवावर बेतल्या जात असून नागरीक मात्र हैराण झाले आहेत. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या आंदोलनानंतरही सदरचे काम रेंगाळले असल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत असून जनतेतून मात्र संताप व्यक्त होत आहे त्रस्त जनता व शहरवाशीय लवकरच गुत्तेदराच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलल्या जात आहे ह्या बाबी कडे लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे
* मुरूम नसल्याचे कारण दाखून काम बंद :- गुत्तेदार प्र.राठी
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गचे काम मुरूम नसल्या कारणाने बंद आहे त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे शासनाने ह्याची तात्काळ दखल घेऊन आम्हास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी द्यावी अन्यथा मुरूम उपलब्ध करून द्यावा त्यानंतर आम्ही हे काम लवकरात लवकर सुरू करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्गाचे गुत्तेदार यांचे प्रतिनिधी राठी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे
No comments:
Post a Comment