केज (प्रतिनीधी) :- एका पारधी समाजातील महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून त्या कुत्र्याने महिलेच्या मांडीचा लचका तोडल्याने महिला जखमी झाली होती. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील जनाबाई शिंदे ही पारधी समाजातील महिला दि. २२ मार्च मंगळवार रोजी दुपारी ३:०० ते ४:०० वा च्या दरम्यान रस्त्याने जात असताना गावातील एकाने तिच्या दिशेने पाळीव कुत्रा सोडला होता. त्याला चावा घेण्याचा इशारा केल्याने त्या कुत्र्याने जनाबाई शिंदे हिच्या डाव्या मांडीच्या मांसाचा लचका तोडला आहे. त्यामुळे ती महिला जखमी झाली. तसेच कुत्र्याच्या मालकाने जखमी महिला जनाबाई शिंदे तिच्या घरी जाऊन त्या रात्री जातीवरून व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे.
सदर महिला जनाबाई शिंदे हिने दि. २७ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
या प्रकरणी जनाबाई शिंदे हिच्या तक्रारी वरून कुत्र्याचा मालक यांच्या विरुद्ध दि. २९ मार्च २०२२ रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ९६/२०२२ भा. दं. वि. २८९, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील चौकशी आहेत
No comments:
Post a Comment