Monday, March 21, 2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवतीर्थ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात शिवजंयती उत्साहात साजरी.










परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 21 मार्च सोमवार रोजी मराठी तिथीनुसार शिवजयंती सणाप्रमाणे संबंध महाराष्ट्रात घरा घरात साजरी केली गेली दरम्यान राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार आपल्या गावात, पक्ष कार्यालयात तसेच प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांच्या घरात सणाप्रमाणे साजरी करा सांगण्यात आलं असून अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आज परळी वैजनाथ येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रामलींगअप्पा घनचेकर हे होते तर प्रमुख पाहुणे तथा वक्ते अॅड.अश्विन साळवे व अॅड.अर्जुन सोळंके यांनी आपले विचार मांडले, कार्यक्रमाची प्रस्ताविक भाषण  शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले या वेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष महेश शिवगण, माणीक लटींगे, धनराज आवाड, सिद्धार्थ लांडगे, सुहास विर, पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment