Tuesday, March 29, 2022

आगामी निवडणुकी संदर्भात मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे - वैजनाथ कळसकर.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) आगामी निवडणुका लक्षात घेता व शिवतीर्थ मुंबई येथील पाडवा मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परळी शहर व तालुक्यातील पदाधिकारी, शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांची तसेच इतर अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी यांची तात्काळ बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे ,प्रवक्ते प्रकाश काका महाजन,राज्यउपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय अरूणोदय मार्केट परळी वैजनाथ येथे दि. २९-०३-२०२२ मंगळवार रोजी दुपारी ४ वा आयोजित करण्यात आली आहे, 
विषय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या मध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी निवडणूकी संदर्भात मनसे ची भुमिका तसेच येत्या २ एप्रिल शनिवार रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क "शिवतीर्थ" येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्याच्या अनुषंगाने साधक बाधक चर्चा व विविध रिक्त पदाधिकारी नेमणुका करण्यात येणार आहे. या बैठकीस परळी शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखा अध्यक्ष,पक्ष सदस्यांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती सुमंत धस जिल्हा अध्यक्ष बीड, श्रीकांत पाथरकर ता.अध्यक्ष परळी, वैजनाथ कळसकर शहर अध्यक्ष परळी वैजनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

No comments:

Post a Comment