Wednesday, March 30, 2022

दशनाम गोसावी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात होणार गंगाधर पुरी यांचा महासन्मान!


*बीड येथे होणाऱ्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - नाना पर्वत, गोरख पुरी.

बीड (प्रतिनिधी) दशनाम गोसावी समाज परिषदेच्यावतीने रविवारी (३ एप्रिल) आशीर्वाद मंगल कार्यालय बीड येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुढीपाडव्याचे औचित्य साधून बीजहोम महायज्ञ संस्कारचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात भटके-विमुक्त यांचे कुशल संघटन करून त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारे गंगाधर पुरी यांचा मान्यवर व साधुसंतांच्या उपस्थितीत महासन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दसनाम गोसावी समाजाचे बीड शहराध्यक्ष नाना पर्वत, शहर युवा उपाध्यक्ष गोरख पुरी यांनी केले आहे.
रविवार दि. ३ एप्रिल२०२२ रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय सोमेश्वर मंदिराजवळ, बार्शीरोड, बीड येथे सकाळी १०:०० संपन्न होत असलेल्या दशनाम गोसावी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात समाज रत्न पुरस्काराचे वितरण, गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा गौरव, एकल गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप तसेच राज्यभरातील २०१ समाज बांधवांच्या बीजहोम संस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. बिजू होम संस्कार हे गुढीपाडव्याच्या दिवशी दि. २ एप्रिल रोजी रात्री ९:०० वाजता संपन्न होणार आहेत.
 या मेळाव्यात व्याख्याते अविनाश भारती यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असुन राज्यस्तरीय मेळाव्याचे अध्यक्षस्थान महंत महेशानंद गिरी (दिल्ली) हे भूषवणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री ना. धनंजय मुंडे उपस्थित असतील. यासह प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, निवृत्त सत्र न्यायाधीश नारायण गोसावी, संघटनेचे राज्याध्यक्ष पंडित गोसावी, मार्गदर्शक भाऊसाहेब भारती, महंत भरत महाराज, मराठवाडा संघटक बाळासाहेब गिरी आदींची उपस्थिती राहणार आहे. बीजहोम महायज्ञाचे उद्घाटन आ. संदीप क्षीरसागर, महंत चिंतामणी भारती गुरू धनराज भारती, ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, संतोष गिरी महाराज शिखर शिंगणापूर आदी साधू संतांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दसनाम गोसावी समाजाचे बीड शहराध्यक्ष नाना पर्वत, शहर युवा उपाध्यक्ष गोरख पुरी यांनी केले आहे.

*गंगाधर पुरी यांचा होणार महा सन्मान!*
गंगाधर पुरी यांनी सेवा निवृत्ती पूर्वी आणि सेवानिवृत्तीनंतर देखील भटके-विमुक्त समाजाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. समाजाच्या प्रश्नावर विविध आंदोलने उभारून समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी कार्य केले. भटके-विमुक्त समाजाचे कुशल संघटन निर्माण करून शासन दरबारी त्यांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दशनाम गोसावी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मान्यवर आणि साधुसंतांच्या उपस्थित त्यांचा महा सन्मान केला जाणार असल्याची माहिती दशनाम गोसावी समाज परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांनी दिली आहे.


*बीड शहरात निघणार धर्मध्वज मिरवणूक*
गुढीपाडव्याच्या दिवशी २ एप्रिल रोजी बीजहोम महायज्ञापूर्वी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सोमेश्वर मंदिर बार्शी रोडपर्यंत आद्य शंकराचार्य व धर्मध्वज मिरवणूक काढण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment