शहरासह ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांनी मनमानी कारभार करत आलेले धान्य वेळेवर न देणे. ग्राहकास आलेल्या मालामध्ये कमी माल देण्याचे प्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मशिनवर अंगठा घेणे आणि रेशन न देणे, ग्राहकास धमकावणे असले प्रकार परळी तालुक्यात सर्रासपणे चालु असून होत असलेल्या प्रकारांना परळी परळी तहसिल कार्यालयाचे पुरवठा अधिकारी खत घालत असल्याचे आरोप तालुक्यातील जनतेतून होत आहेत. याप्रकरणी तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांना आणि तालुका पुरवठा अधिकारी यांना तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नेमका न्याय मागावा कुठे असाही प्रश्न नागरीक करत आहेत. होत असलेल्या प्रकारांकडे लवकरात लवकरनिर्बंध घालावा. नागरीकांना धमाकवून पिळवणूक आणि फसवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकांदारांवर आणि त्यांच्यावर कार्यवाही न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका पुरवठा अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करुन निलंबीत करण्यात करण्यात यावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.
No comments:
Post a Comment