केज (प्रतिनिधी ) केज सारख्या ग्रामिण भागात उच्च शिक्षण देण्याचा आग्रह माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर साहेबांचा असल्यामुळे 1990 ला त्यांनी वसंत कला ,वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले होते.ते आज बाबुरावजी आडसकर महाविद्यालय म्हणुन ओळखले जाते. अगदी वीस वर्षाच्या काळातच या महाविद्यालयाने कला व विज्ञान या शाखेच्या संशोधन क्षेञाबरोबरच वाणिज्य विभागातही नेञदिपक कामगिरी केली आहे.
बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणुन काम करणारे डॉ.सुधीर आगळे, डॉ.प्रशांत काळम व डॉ.शाम सरसरे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणुनअधिकृत मान्यता दिली आहे. आता केज तालुक्यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करुन वाणिज्य विषयात पीएच.डी.मिळविण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment