Thursday, March 24, 2022
महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी तिघांना सक्तमजुरी.
महावितरणचे सहायक अभियंता श्रीकांत बाळासाहेब गोरे हे पथकासह ६ ऑगस्ट २०१८ रोजी आसेगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मकसूद खान याच्या घरातील विजेची तपासणी केली असता तो वीजचोरी करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या घराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर मकसूद खान याने सहायक अभियंता गोरे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. पथकातील कर्मचाऱ्यांनादेखील धक्काबुक्की करून एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. या प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात मकसूद खान मकबुल खान पठाण (वय ३८), मोहसीन खान मकबुल खान पठाण (वय २५) आणि हरिभाऊ पंढरीनाथ राजगुरू (३३) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment