
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित परळी सार्वत्रिक निवडणूक २०२२-२७ साठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात ४० उमेदवार आपले भवितव्य आजमावत होते. त्यांनी विविध चार पॅनल करून त्यात परिवर्तन पॅनल, बहुजन विकास आघाडी तसेच, दोन अपक्षांनी देखील सहभाग नोंदवला होता. दि २१ मार्च रोजी जुनी क्लब बिल्डिंग येथे ४०४ मतदारापैकी ३७९ सभासदांनी मतदानात सहभाग घेतला. सायंकाळी साडे पाच च्या दरम्यान मतमोजणी होऊन विद्यमान संचालक मंडळाचे विकास पॅनल चे ११ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर, जनसेवा पॅनलला अवघ्या दोन उमेदवारावरच समाधान मानावे लागले आहे.
विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे -
गित्ते बालाजी माणिकराव - मिळालेली मते - २२४, भिसे अभिमन्यू चंद्रभान १७६, रणदिवे चेतन दत्तात्रय १६६, मुंडे श्रीगणेश महादेव १५५, बिडगर मदन ज्ञानोबा १२८, अनुसूचित जाती व्हावळे अशोक काशिनाथ १५९, महिला राखीव फड वैशाली बाळासाहेब १८४ इतर मागास शिंदे मुरलीधर विनायक १८०, आणि भटके विमुक्त जाती जमाती मुंडे अशोक बाबुराव १६२ मते घेऊन विजय संपादन केला आहे. तर जनसेवा पॅनल चे गित्ते हरिराम बाबुराव १३०, आणि महिला राखीव मधून फड ज्योती अंगद १५२ मते यांनी हि विजय संपादन केला. वडमारे बप्पासाहेब लक्ष्मणराव यांनी सर्वसाधारण मतदार संघात निवडणूक लढून १०० मते घेऊन एकाकी झुंज दिली. तसेच अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या या निवडणुकीत दिग्गज उमेदवार पराभूत झालेले आहेत. या निवडणुकीत अत्यंत खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून नितीन पंडित यांनी काम पहिले. परळी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महिंद्रसिंग ठाकूर, रवींद्रकुमार पवार, पठाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment