Saturday, March 26, 2022

राज्यात अनेक अडचणी, समस्या प्रश्नासाठी जनता दारोदार.अन आमदारांना घरदार .राज्यात २८८ पैकी २६६ आमदार कोट्याधीश.

बीड (प्रतिनिधी)राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना मुंबईत घरे देण्याची घोषणा केली आणि समाजमाध्यमांवर सडकून टीका सुरु झाली राज्यातील ४५ लाख शेतकऱ्याचे प्रश्न ,एसटी कामगाराचा प्रश्न ,विजेचा प्रश्न ग्रामीण भागातील घरकुलाचे लाभार्थी अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि कोरोना मुले आर्थिक अडचणीत सरकार असताना मागील आठवड्यात आमदाराचा निधी त्याच्या स्विय सहाय्यकाचा आणि वाहनचालकांचा पगार वाढवला असताना आता आमदारांना मुंबईत घरे बांधून देण्याची घोषणा पहाता आमदार खरेच गरीब आहेत का अन त्यांना घराची नितान्त गरज आहेच का सध्याच्या आकडेवारीवरून पहिले असता २८८ पैकी २६६ आमदार कोट्याधीश आहेत यात काँग्रेस ९६ टक्के ,भाजप ९५ टक्के,शिवसेना ९३ टक्के,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ८९ टक्के आमदाराचा समावेश आहे .
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही मोठी घोषणा केली कि मुंबईतील गोरेगावमध्ये ग्रामीण भागांतून येणाऱ्या आमदारांसाठी ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. अनेक आमदार हे राज्याच्या ग्रामीण भागांतून मुंबईत येत असतात. त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची म्हणजे राज्य सरकारची आहे, दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सभागृहात याबाबत माहिती दिली. सर्वपक्षीय आमदारांना कायमस्वरूपी घरे देत आहोत, त्याचाही आनंद आहे, असेही ते म्हणाले.मागील काही दिवसापुरवीच ठाकरे सरकारने आमदारांच्या निधीत मोठी वाढ केली होती त्याच्या  स्वीय सहायकं याना २० हजार वरून ३० हजर पगार केला त्याच सोबत चालकांना २० हजर रुपये पगार केली आमदारांना मिळणाऱ्या सवलती पहिल्या तर त्यांना जेमतेम पगार १ लाख ८२ हजार २०० रुपये ,महागाई भत्ता ३०९७४ ,दूरध्वनी ८ हजार ,स्टेशनरी १० हजार ,संगणक चालक १० हजार ,पीए २५ हजार रुपये ,अधिवेशन उपस्थिती प्रतिदिन २ हजार रुपये ,मोफत लॅपटॉप प्रिंटर एसटी रेल्वे विमान प्रवास आणि ५० हजार रुपये पेन्शन . आणि आता घरे देखील देण्यात येणार आहेत या निर्णयानंतर राज्यभरातून समाज माध्यमावर रोष व्यक्त केला जात आहे या नंतर लागलीच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा करत हि घरे मोफत दिली जाणार नाहीत त्यासाठी रक्कम आकारण्यात येणार आहे असे नमूद केले तरी अनेक तिखट प्रतिक्रिया मठात आहेत एकीकडे शेतकरी विजेसाठी झटतोय त्यांना वीज नाही अन याना घरे तेही आम्ही भरलेल्या टैक्स मधून आमदार खर्च दारिद्र्य रेषेखाली आहेत का आता त्याना मोफत गहू अन तांदूळ देण्याचा निर्णय घ्यावा ,पण खर्च पाहिलं तर आमदारांना मुंबईत घराची गरज आहे का त्यांना निवासस्थान दिलेले असते ते कशासाठी सर्वच पक्षातील बहुतांशी आमदार कोट्याधीश आहेत राज्यात गरिबांना घरकुल लवकर मिळत नाही शेतकरी अडचणीत आहे  एसटी कर्मचारी गेल्या काही महिन्या पासून अदिलन करत आहेत अनेक शासकीय कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर होत नाहीत आताच कोरोनाचे संकट गेले सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आहे असे एकीकडे सरकार सांगत असताना आमदारानं घरे देण्यासाठी एवढा निधी कसा येणार यामुळे सरकार टिकेल पण सरकार विषयीची जनतेच्या मनातील सहानुभूती फार काळ काही टिकणार नाही अस्या प्रतिक्रिया राजकीय जाणकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत .
...............................
आमदाराला काय मिळत
आमदारांना मिळणाऱ्या सवलती पहिल्या तर त्यांना जेमतेम पगार १ लाख ८२ हजार २०० रुपये (टर्म नुसार ) ,महागाई भत्ता ३०९७४ ,दूरध्वनीसाठी  ८ हजार रुपये ,स्टेशनरी १० हजार रुपये ,संगणक चालक १० हजार रुपये ,पीए २५ हजार रुपये वेतन आता आणखी वाढ केली  ,अधिवेशन उपस्थिती प्रतिदिन २ हजार रुपये ,मोफत लॅपटॉप प्रिंटर एसटी रेल्वे विमान प्रवास आणि ५० हजार रुपये पेन्शन अशा सवलती राज्य शासन देते .

No comments:

Post a Comment