बीड (प्रतिनिधी) शिवसेनेचे शिव संपर्क अभियान व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची समीकरणे देखील बदलणार असल्याचे चित्र दिसू लागला आहे. आज सायंकाळी पाच जणांच्या पक्ष प्रवेशाने आगामी काळातील विजया चे दरवाजे क्षीरसागरांसाठी खुले होणार आहे.
शांततेच्या काळातच युद्धाची तयारी करावी लागते असं म्हणतात त्याच रणनीतीचा वापर करत जयदत्त क्षीरसागर यांनी भविष्यकाळात विजयश्री मिळावी. निवडणुकीच्या रणसंग्रामात कमी श्रमात सहज सहज विजय मिळवता यावा यासाठी आजपासूनच कंबर कसली आहे. दूरदृष्टी लाभलेल्या या नेत्यांने पूर्वी झालेल्या पराजयाचा अनुभव गाठीशी असताना देखील पुतण्या सोबतची लढाई गांभीर्याने न घेतल्याचा परिणाम पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आता जयदत्त क्षीरसागर कुठलीच जोखीम पत्करण्याच्या मानसिकतेत नसल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. बीड नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप करून नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना सळो कि पळो करून सोडणारे वेळप्रसंगी न्यायालयात खेचणारे अमर नाईकवाडे यांना झालं गेलं विसरून जाण्यास भाग पाडतात पुन्हा जवळीकता साधत आपलंसं करण्यात यश मिळवले आहे. नगरपालिकेचे गटनेते फारुख पटेल यांच्या विरोधाची धार बोथट करत स्वतःच्या छावणीत डेरेदाखल होण्यास प्रवृत्त केलं. ही राजकीय चाल नगरपालिका निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरणार आहे. सोबतच फारसा हक्काचा मतदार नसला तरी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून नावाजलेले बाबुशेठ लोढा यांनादेखील आपलंस करण्यात क्षीरसागर यांना यश मिळाले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने ग्रामीण व शहरी समीकरणं काही प्रमाणात जुळून येण्यास मदत होणार आहे. याबरोबरच
ग्रामीण राजकारणावर चांगली पकड असणारी दोन खंबीर व्यक्तिमत्व आपल्या गळाला लावण्यात ते यशस्वी झाले आहेत. माजी जिप उपाध्यक्ष गंगाधर घुमरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकात आधिपत्य मिळवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. सोबतच बाला घाटावरच मोठ प्रस्थ म्हणून नावाजलेले नितीन लोढा यांच्या पक्षप्रवेशाने जि.प.पं.स. निवडणुकीवरची पकड आणखी मजबूत होणार आहे. नितीन लोढा राजकीय महत्वकांक्षा नसलेलं व्यक्तिमत्त्व असलं तरी भिमा शंकर साखर कारखान्यामुळे त्यांची समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडली गेली आहे. शेठ जिकडं आम्ही तिकडं असं म्हणणारा 70 टक्के वर्ग त्यांच्या मागे आहे. या पाच दिग्गजांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीतील विजय आपलासा करण्यात जयदत्त क्षीरसागर यांना सध्या तरी यश मिळत असल्याचं दिसत आहे.दूरदृष्टी,बेरजेच राजकारण,विरोधकांना आपलंसं करण्याची क्षमता. गूणांच्या जोरावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी एकाच बाणाने विरोधकास घायाळ करत निवडणूकीच मैदान आपलंच असल्याचा विश्वास शिवसैनिकात निर्माण करून जोश भरला आहे.फारूख पटेल यांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली शिवशाहीत सर्वधर्मीयां सोबतच मुस्लिमही तितकेच सहभागी आहेत हा सोशल इंजिनिअरिंगचा संदेश देण्यात देखील ते यशस्वी झाले आहेत.मध्यंतरी शेवटच्या घटका मोजत असलेली शिवसेना पुन्हा भगव वादळ निर्माण करण्यात यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळत आहे
No comments:
Post a Comment