Thursday, March 24, 2022

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पशुपालक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी -आ.नमिता मुंदडा.


केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत पशुपालक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे परंतु त्यांना अद्यापही सरकारकडून आर्थिक मदत मिळालेली नाही त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

अतिवृष्टी मधे मोठ्या प्रमाणात मयत झालेल्या जनावरे , शेळ्या , कोंबड्या यांचा बळी गेलेला आहे. आ . नमिता अक्षय मुंदडा यांनी याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री ना . विजय वडेट्टीवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे लेखी केली आहे .

पशुपालक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ना . विजय वडेट्टीवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की , बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनावरे चाहून गेली , मेंढ्या/ शेळ्या / कोंबड्या मयत झाल्या त्यामुळे शेतकयांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते . त्यांचे संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांनी पंचनामे करून अहवाल पाठवला आहे . परंतु अद्यापही ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे जनावरे / शेळ्या / कोंबड्या मयत / बाहून गेलेल्या आहेत त्यांची त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली नाही . अतिवृष्टीमुळे जनावरे / शेळ्या / कॉबड्या , मयत / वाहून गेल्याने शेतकरी पूर्ण उध्वस्त झालेला आहे .

त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे . तरी आशा नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी यांना त्वरित निधी उपलब्ध करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी केलेली आहे. आ.मुंदडा यांनी केलेल्या या मागणीमुळे नुकसानभरपाई करीता पशुपालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment