*महाराष्ट्रातील खेळाडूंना सर्वाधिक पदके.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीची सुपुत्री कु.सान्वी सचिन सौंदळे हीने बेंगलुरू येथील राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश मिळवत सब ज्युनिअर गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
16वी राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टीक स्पर्धा गोपालन स्पोर्ट सेंटर बेंगलुरू येथे दि.25 व 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून अॅक्रोबॅटीक्स व एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
सदरील स्पर्धेत परळीची सुकन्या सध्या औरंगाबाद येथे सहावीत शिक्षण घेणारी कु.सान्वी सौंदळे हीच्यासह गीत भालसिंग, अनुराग देशमुख, विश्वेश पाठक, रिया नाफडे या खेळाडूंनी सब ज्युनि्अर गटातील बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
कु.सान्वी ही कै.अरविंद सौंदळे व जी.एस.सौंदळे गुरूजी यांची नात असून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांची पुतणी आहे.
भारत देशाच्या विविध राज्यातील खेळाडूंसह महाराष्ट्राचा संघ नॅशनल डेव्हलपमेंट ग्रुप, सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनीअर,अशा चार वयोगटात पुरूष एकेरी,महिला एकेरी,मिश्र दुहेरी,तिहेरी समुह व एरो डान्स या सादरीकरण प्रकारात खेळाडू सहभागी झाले होते.
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सर्वाधिक पारितोषिक मिळविले. महाराष्ट्राच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून हर्षल मोगरे,सर्वेश भाले,हर्षद कुलकर्णी तसेच संघ व्यवस्थापक प्रा.निलेश जोशी,दिपाली बजाज यांचे मौलिक मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.
सान्वी सह महाराष्ट्रातील खेळाडूंनी जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक केले जात असून खेळाडूंना आंतर राष्ट्रीय स्पर्धेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment