Wednesday, March 23, 2022

महात्मा फुले सार्वजनीक जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अंगद माळी तर सचीवपदी साईनाथ डोके

 परळी वैजनाथ ( प्रतिनिधी ) प्रतिवर्षाप्रमाणे याहिवर्षी  माळी समाज बांधवांच्या वतीने परळी शहरात क्रांतीसुर्य थोरसमाज सुधारक  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती सोहळयाच्या नियोजना निमीत्त श्रीसंत सावता माळी मंदीर येथे  माळी समाजातील जेष्ठ समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थीतीत जयंती उत्सव समीतीची निवड करण्यात येउन त्यात अध्यक्षपदी श्री अंगद विजय माळी तर सचिवपदी साईनाथ डोके यांची एकमताने निवड करुन जयंती उत्सव सोहळयाचे नियोजन करण्यात आले.
         सावता माळी मंदिर येथे आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत उत्सव समीतीच्या निवडीसह जयंती सोहळयाबाबतहि सविस्तर चर्चा करण्यात आली यात अनेकवर्षापासुन अर्धवट असलेली सावतामाळी स्वागत कमाणीचे काम पूर्ण करणे. ११ एप्रील रोजी भव्य शोभायाञा काढणे, व महात्मा फुले यांच्या जीवन चरिञावर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. या बैठकीत उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अंगद माळी, उपाध्यक्षपदी चक्रधर शिंदे, सचिवपदी साईनाथ डोके, सहसचिव अभिनव लोखंडे, कार्याध्यक्ष गौरव पाथरकर, कोषाध्यक्ष आकाश जांभळे तर सदस्यपदी गणेश बोराटे, कृष्णा शिंदे, नागेश खेञे, रोहण लोखंडे, नितीन गोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीस इंजिनीयर सुनिॅल काळे, प्रभाकर लोखंडे, बापु आरसुडे, आरुण शिंदे, दत्ता लोखंडे, गोविंद लोखंडे सर, डिगांबर बनसोडे, आमोल वंजे, बाळासाहेब फुले, सुधाकर शिंदे, दशरथ गोरे, प्रविण काळे, अमोल आरसुडे, पांडुरंग  कीटाळे, सदानंद लोखंडे, नेताजी लोखंडे, निखील लोखंडे, पवन खरोळकर, राजकुमार डाके यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठयासंखेने सहभागी झाले होते. या बैठकीची प्रस्तावणा श्री दत्ता लोखंडे यांनीॅ तर आभार प्रदर्शन राजकुमार डाके यांनीॅ केले.

No comments:

Post a Comment