Tuesday, March 22, 2022

स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यु हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ब्रम्हवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे उद्घाटन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यूळ हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन तालुक्यातील मौजे ब्रम्हवाडी येथे (दि.२२) मार्च मंगळवार रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
        तालुक्यातील मौजे ब्रम्हवाडी येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून (ता.२२) मार्च रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे उपस्थित होत्या. यावेळी मंचावर न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एच. शेंडगे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय सोळंके, सरपंच मंगलाताई गीते, माजी सरपंच नवनाथ गीते, उपसरपंच सुभाष गावडे, तालुका लेखापाल विष्णू मुंडे, उपप्राचार्य सुनील लोमटे, प्रा.डॉ. बी आर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. लक्ष्मण मोरे यांनी स्वच्छता व साक्षरता संदर्भात उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून कोरोनाकाळात स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीहरी गुट्टे यांनी तर सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे केले.व आभार प्रा.बी.ए. कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment