*छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श राज्य निर्माण केले-ज्ञानदेव काशिद.
*गुलाब अप्पाराव शेटे, पत्रकार प्रशांत प्र.जोशी व प्रा.अरूण पवार यांचा विशेष गौरव .
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगाच्या पाठीवर आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी आपल्या राज्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या नागरिकांच्या प्रगती आणि सुरक्षेचा विचार केला आहे. छ.शिवाजी महाराज हे आदर्श राजे असून त्यांच्या सुराज्याचे विचार आजही तेवढेच अनुकलनीय असून राजांच्या सुराज्य धोरणावर जर आपण काम केले तर महाराष्ट्र नेहमीच जनतेचे राज्य म्हणून ओळखले जाईल असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते ज्ञानदेव काशिद (बीड) यांनी व्यक्त केले. व्याख्यानापूर्वी दयानंद व्यायाम शाळेच्या विद्यार्थिनीनी लाठी, तलवार, दांडपट्टा आदीची प्रात्यक्षिके सादर केली. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज परळी येथे जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोंढा मैदानावर साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँगे्रसचे जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊराव भोयटे, दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष अॅड.राजेश्वर देशमुख, भाजयुमोचे अरूण पाठक, राष्ट्रीय काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख, न.प.शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, वंचितचे मिलींद घाडगे, रिपाइंचे शुभम इंगळे, वैजनाथ सोळंके, जगन्नाथ साळुंके, अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, मनसेचे वैजनाथ कळसकर, संपादक राजेश साबणे, पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, आत्मलिंग शेटे, जगदीश शिंदे, संतोष जुजगर, आनंद तुपसमुद्रे, बालाजी ढगे, नरसिंग अन्नलदास, अनिल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध कवी तथा साहित्यीक पंजाबराव येडे यांचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आई तुळजाभवानी, जिजाऊ माँसाहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथींच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष काम करणारे गुलाब अप्पाराव शेटे, पत्रकारीता क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून उल्लेखनिय कार्य करणारे दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत प्र.जोशी, आपल्या कवितेच्या माध्यमातून साहित्य संमेलन गाजविणारे प्रा.अरूण पवार यांचा व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सर्व पाहुणे आणि पुरस्कार विजेत्यांचे स्वागत समितीचे संस्थापक अभयकुमार ठक्कर, मार्गदर्शक प्राचार्य अतुल दुबे, सतिश जगताप, अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे यांच्यासह अनेकांनी केले.
आपल्या विशेष व्याख्यानात ज्ञानदेव काशिद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श राजवटीची अनेक उदाहरणे देत उपस्थितांना सुराज्य म्हणजे काय असते हे स्पष्ट केले. शिवरायांनी केवळ लढाया करून किल्ले जिंकले नाहीत तर राज्यातील सामान्य नागरिकांच्या मनावर प्रेम करीत अधिराज्यही केले आहे. शिवरायांनी तहामध्ये काही किल्ले गमावले परंतू आपल्या राजावर आलेले संकट आपल्यावरचे आहे असे समजून समस्त मावळयांनी गेेलेली सर्व किल्ले परत आणली आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यातील शेतकरी, बारा बलुतेदार यांच्यासह अठरा पगड जातीच्या समाजाला एका प्रवाहात आणून आदर्श राज्याची निर्मिती केल्याचे काशिद म्हणाले. आजच्या व्याख्यानात शिवरायांचा आठवावा प्रताप असे सांगत असताना काशिद यांनी दिलेली उदाहरणे आज सुद्धा अत्यंत महत्वाची असल्याचे दिसून येत होते. काशिद यांच्या व्याख्यानाने उपस्थित नागरिकही भारावून गेले होते. व्याख्यान ऐकण्यासाठी व्यासपिठावरील मंडळीसुद्धा खाली सामान्य नागरिकांसोबत बसलेली होती. व्याख्यानापूर्वी दयानंद व्यायाम शाळेच्या विद्यार्थिनीनी लाठी, तलवार, दांडपट्टा आदीची प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज शिवजयंतीचे वातावरण अधिक भगवेमय व उत्साहवर्धक झालेले होते. कार्यक्रमाचे संचलन प्राचार्य अतुल दुबे तर आभार प्रदर्शन संजय कुकडे यांनी केले. याच कार्यक्रमात वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध मंदिरांची केलेली स्वच्छता मोहीम लक्षात घेवून त्यांना विविध प्रकारचे साहित्य प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात ध्येय मंत्र व प्रेरणामंत्राने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमास शहर व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुकडे ,बाळासाहेब देशमुख, संजय गावडे,संजय सोमाने ,सुरेश परदेशी, प्रा.डॉ.जगदीश कावरे,शिवाजी दराडे, नवनाथ सरवदे, गजानन कोकीळ, माऊली मुंडे, नवनाथ वरवटकर, किशन बुंदिले ,संस्कार पालीमकर, योगेश जाधव मनीष जोशी,अमित कचरे, दीपक जोशी बजरंग औटी,नवल वर्मा सिद्धार्थ गायकवाड शिवम मोहिते, वरात कुलकर्णी लक्ष्मण मुंडे, धनंजय गोतावळे, योगेश घेवारे, संतोष पुजारी, अशोक पुजारी, दत्ता घुले, संजय कदम, गोविंद चिवडे, वैभव देवकर, सखाराम पवार,अनिल घोबाळे,योगेश जाधव, जगदीश पवार, नरेश मैड, सोमनाथ गायकवाड, अभिजित पवार, प्रकाश देवकर, करण कुसळे, विनित वानरे, रवी देवकर, मोहित जोशी, बालाजी सातपुते, हनुमान जाधव, नागनाथ तूपसौंदर, बालाजी ढगेकर, कैलास तूपसौंदर, जालिंदर फड,राखमाजी ढाकणे, तुकाराम साठे, मजिद शेख, प्रमोद उदगीरकर,युवराज आंधळे, गणेश शिंदे, सोमनाथ सातपुते, प्रदिप मजळे, बाबासाहेब पवार, रामभाऊ भदाडे, बाबुराव गडदे,यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment