
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येचा संशय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी राठोड यांचा राजीनामा घेण्याबाबत पवारांनी सल्ला दिला होता. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकमत आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल आहे. तसेच ज्या वेळेस मंत्र्याविरोधात गंभीर आरोप होतात, तेव्हा राजीनामा घेतला जातो असे शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
No comments:
Post a Comment