Tuesday, February 9, 2021

बलभीम कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनीची कर्मचाऱ्याशी हुज्जत. कामबंद आंदोलन सुरू !


शहरातील बलभीम महाविद्यालयात सानप नावाच्या एका विद्यार्थिनीचे ऍडमिशन गेल्या काही वर्षांपासून आहे .या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती साठी अर्ज केला होता,मात्र त्यामध्ये काही त्रुटी असल्याने शिष्यवृत्ती मंजूर होऊ शकली नाही .

याबाबत संबंधित विद्यार्थिनीला नेहमी संगणायत आले परंतु ती प्रत्येकवेळी येऊन कर्मचाऱ्यांना आणि प्राचार्यांना अपशब्द वापरून अपमानित करत होती .मंगळवारी ही विद्यार्थिनी परत महाविद्यालयात आली,शिष्यवृत्ती विभागाचे कर्मचारी श्रीराम यांच्याशी तिने हुज्जत घातली .वाद एवढा वाढला की श्रीराम हे चक्कर येऊन जागेवर कोसळले .त्यांना काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू केले,या विद्यार्थिनीचे पालक हे पूर्णवादी बँकेत नोकरीस आहेत,महाविद्यालय प्रशासनाने तिच्या पालकांना आणि बँकेच्या मॅनेजर ला बोलावून हा प्रकार सांगितला, मात्र तरीही या विद्यार्थिनीने त्रास देणे थांबवले नाही .

या सर्वच प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले .या सगळ्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे .

No comments:

Post a Comment