किल्ले धारूर (प्रतिनीधी );- किल्ले धारूर शहरातील आंबाचंडी परिसरातील काही दिवसाखली अचानक डोंगराला आग लागल्याने या आगीत पन्नास एककर डोंगर जळून खाक झाल्याची घटना घडली
किल्ले धारूर शहरातील आंबाचंडी परिसरातील डोंगरावर दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत विविध जातींची जवळपास पाचशे झाडे जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. याठिकाणी हे क्षेत्र जाधव यांच्या मालकीचे असून या डोंगर क्षेत्रात हजारो झाडे लावण्यात आलेली होती मात्र या ठिकाणी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही सर्व झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पर्यावरणप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी अशाप्रकारे आगी लागून झाडांची हानी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून अशा आगी लागण्याचे गौडबंगाल काय? याचा शोध वनविभागाने घ्यावा,अशी मागणी किल्ले धारूर पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
"""""""""""""चौकट""""""""""""""
रुपेश जाधव(डोंगर मालक)
आम्ही या काही क्षेत्रात गेल्या वर्षी शिताफळी, गावरान बोरे तसेच कडू लिंबाचे झाडे जोपासले होते मात्र अचानक डोंगराला लागलेल्या आगीत पूर्ण डोंगर जळून खाक झाले असून आत्तापर्यंत कुठलाही वनक्षेत्र कर्मचारी भेटण्यासाठी सुद्धा आलेले नाहीत.

No comments:
Post a Comment