Thursday, February 11, 2021

कोरोनाच्या काळातील दुप्पट-तिप्पट दिलेले वीजबिल पूर्ण माफ करा व इंधनाचे दर तात्काळ कमी करा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.



बीड (प्रतिनिधी) वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली त्यावेळी संभाजी ब्रिगेड सह अनेक पक्ष संघटनांनी आवाज उठवला,आंदोलने केली, तेव्हा आघाडी सरकारचे विज मंत्री श्री. नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते, मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास सर्व नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन नोटीस पाठवले आहेत हा मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असून हुकूमशाही शासन करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे. यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामान्यजनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे  व सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे. तसेच नुकतेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल ,गॅस चे दर भरमसाठ वाढवलेले आहे यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे,यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत नसता या जनहिताच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा 
शशिकांत कन्हेरे सर केंद्रीय निरीक्षक, महेंद्र मोरे  जिल्हाध्यक्ष, राहुल डावकर तालुकाध्यक्ष, राजेश काकडे तालुका उपाध्यक्ष, महेश नेवडे आदीनी दिला आहे.

No comments:

Post a Comment