सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकूण ३१ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रवेश केलेल्यांचा सत्कार केला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे.

No comments:
Post a Comment