Monday, February 1, 2021

आरोग्य विभागाचा गलथान कारभार. पोलिओ डोस ऐवजी पाजले सॅनिटायझर ! 12 बालके अत्यवस्थ !!


यवतमाळ (प्रतिनीधी )- भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्निकांड घटनेमुळे दहा बालकांचा जीव गेला असताना आता यवतमाळ मध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे .पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याने 12 बालकांची प्रकृती बिघडली आहे .या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी दिले आहेत .

राज्यभरात पोलिओ लसीकरणाची मोहिमे मोठ्या थाटामाटात राबवण्यात आली. पण, यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12 बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment