इंदापूर : ( प्रतिनीधी) वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात परत एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घोळत होता. माञ, ठाकरे सरकारमधील एक मञ्यांनेच महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होणार नाही. मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये, यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते इंदापुरात बोलत होते.
महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने पसरतो आहे. पुण्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर आज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथील स्थानिक प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाय योजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. इंदापूर तालुक्यात सध्या १०८ जण कोरोना पॉझिटिव रुग्ण आहेत, यामध्ये इंदापूर ग्रामीण मधील ७६, तर इंदापूर शहरात सध्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्वांवरती उपचार सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भिगवण, पळसदेव आणि मदनवाडी तर इंदापूर शहरात आंबेडकरनगर या भागात जास्त रुग्ण आढळत असल्यामुळे या भागात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी अधिकार्यांना दिले.
कोरोना अजून गेलेला नाही : कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे, असा सल्ला दत्ता भरणे यांनी जनतेला दिला आहे. इंदापूर शहर आणि तालुक्यात जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. या कारवाईत अनेक जण नाराज होतील,माञ कोरोना अधिक वाढू नये म्हणून अशी कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरा असे आवाहन दत्ता भरणे यांनी केले आहे.
4.jpg)
No comments:
Post a Comment