Thursday, February 11, 2021

बीड येथील हॉस्पिटलच्या टाॕयलेटमध्ये सापडले अर्भक !


बीड - ( प्रतिनीधी)  शहरातील जालना रोडवर असलेल्या वीर हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास टॉयलेट मध्ये पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे .या प्रकरणी शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे .

जालना रोड वरील डॉ संजय वीर यांच्या वीर हॉस्पिटल मधील टॉयलेट मध्ये एक अर्भक असल्याची माहिती मिळाली .शहर पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर असलेल्या टॉयलेट मध्ये एक अर्भक मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले

No comments:

Post a Comment