कार्यालय पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, जालना
टोल फ्री क्रमांक-१०६४
कार्यालय दूरध्वनी क्र :- ()2482-220252
प्रेस नोट ::
दिनांक :- 15.02.2021.
१) आरोपीचे नाव व पता :-लोकसेवक श्री जयदिप मधुकर शितोळे वय 30 वर्ष लायसाय नोकरी उप अधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, पैठण, जि. औरंगाबाद रा बालाजी विहार रो हाऊस D 12 पैठण, ता. पैठण जि. औरंगाबाद मुळ रा. तुंगत ता. पंढरपुर जि. सोलापुर (वर्ग-2)
२) गुन्हा घ ता व ठिकाण :- 15.02.2021 रोजी तालुका भुमी अभिलेख कार्यालय पैठण,जि औरंगाबाद येथे
३) लाचेची रक्कम :- १५००० रुपये
याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे वडीलांचे नावे असली बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद येथील सिटी सव्हे नं 1259 मधील जागा वाटणीपत्राव्दारे त्यांचे वाटयाला आलेली 129.5 चौ.मी क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता, सदरचा अर्ज पुरढील कार्यवाहीसाठी तालुका भुमी अभिलेख,पैठण यांचे कडेेे पाठवल्याने त्यांनी उप अधिक्षक, तालुका भुमी अभिलेख पैठण यांचेकडे जावून त्यांचे वाटयाचे क्षेत्रफळाची नोंद करणे बाबत विचारणा केली असता तेथील उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांनी, तुमच्या क्षेत्रफळाची नोंद करायची असेल, तर तुम्हाला मला 20,000/- रुपये दयाचे लागेल, असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे 20,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधुन तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 15.02.2021 रोजी पडताळणी केली असता उप अधिक्षक श्री. जे. एम. शितोळे यांनी तक्रारदार यांचेकडे 20.000/- रूप लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच दि. 15.02.2021 रोजी आलीसे उप अधिक्षक श्री. जयदिप मधुकर शितोळे यांनी तक्रारदार यांचेकडुन तडजोडीअंती 15.000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने उप अधिक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, पैठण जि. औरंगाबाद येथे रंगेहाथ पकडले.लोकसेवक श्री. जयदिप मधुकर शितोळे वय 30 वर्ष व्यवसाय नोकरी उप अधिक्षक, भूरमी अभिलेख कार्यालय, पैठण, जि. औरंगाबाट रा बालाजी बिहार रो हाऊस D I2 पैठण. ता. पैठण जि. औरंगाबाद मुळ पा. तुंगत ता. पंढरपुर जि. सोलापूर (वर्ग-2) यांचे विरुध्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार, ला.प्र.विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप अधिक्षक श्री. रविंद्र डी.निकाळजे. तसेच कर्मचारी श्री. ज्ञानदेय जुंबड, श्री.मनोहर खंडागळे, श्री. अनिल सानप श्री. जञानेश्वर म्हस्के, श्री. गजानन घायवट, श्री. जावेद शेख, श्री. शिवाजी जमधडे, श्री. गणेश चेके, श्री. सचिन राजत श्री. कृष्णा देते. श्री. गणेश बुजाडे, श्री. गजानन कांबळे य चालक श्री. प्रविण खंदारे, श्री. आरेफ शेख यांनी पार पाडली.
तसेच अॅंटी करप्शन ब्यूरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेचक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482-220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.
पोलीस उप अधिक्षक, ला प्र वि, जालना..
👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ
No comments:
Post a Comment