Sunday, February 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर बीड शहरात कारवाई.


बीड (प्रतिनिधी)- कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागु केलेले आहेत . कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असुन आज सकाळपासुन शहरातील प्रत्येक रस्त्यावर पोलिस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली आहे . पोलिस प्रशासनाच्यावतीने शहरात अनाउसींग करण्यातआली असुन मास्क बंधनकारक करण्यात आला आहे . दरम्यान आठवडाभरापुर्वी २० च्या आत रूग्णसंख्या असलेल्या बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आज ५० च्या पुढे सरकल्याने ' तो परत येतोय ' आता पुन्हा स्वत : ची आणि कुटुंबाची काळजी घ्या , गर्दी टाळा , मास्क वापरा . 

रूग्ण वाढत असल्याने प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे . आज सकाळपासुनच जालना रोड , शिवाजी नगर ठाणे , सुभाष रोड , भाजीमंडई , बशीरगंज चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक , बार्शी नाका , माळीवेस , मोंढा नाका , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागांमध्ये पोलिस आणि न.प.कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली . शहरात फिरतांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे .

No comments:

Post a Comment