Tuesday, February 16, 2021

आर्थिक कारण पुढे करत महानिर्मितीने परळीतले सगळेच संच केले बंद.


  • विजेची मागणी नसल्याने नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच बंद

परळी वैजनाथ ;-  उन्हाळा तोंडावर असतानाही परळीत असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील वीज वीजनिर्मिती मंगळवारपासून बंद करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत वीज निर्मिती केंद्र केवळ आर्थिक कारण (MOD – मेरिट ऑर्डर डिसपॅच) पुढे करत बंद केले आहेत.
परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.6, 7, 8 हे प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे संच आहेत. या तिन्ही संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे. आता हे संच नेमके किती दिवस बंद राहणार आहेत, याबद्दलची माहिती मात्र मिळू शकलेली नाही.
आज मंगळवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 च्या दरम्यान केंद्रातील संच क्र. 6 व संच क्र. 7 हे बंद करण्यात आले असून क्र 8 हा ही संच चालू आहे. तसेच या संचातून दुपारपर्यंत 180 मेगावँट एवढी विज निर्मिती चालू आहे. स्थानिक प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने चालु वीजनिर्मिती बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.
वीज निर्मीतीसाठी आवश्यक कोळसा व कच्च्या मालावरील खर्च वाढलेला असून वाढलेला उत्पादन खर्च कंपनीच्या आर्थिक धोरणांच्या निकषात बसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. वीज निर्मितीला प्राधान्य देण्याऐवजी कंपनीच्या एमओडी (मेरिट ऑर्डर डिसपॅच) मध्ये बसत नसल्याने वीज निर्मिती करणे परवडत नसल्याचे कारण देऊन वीज निर्मिती पूर्णत: ठप्प करण्यात आली आहे.  परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दोन संचबंद ठेवण्यात आले आहेत,ते लवकरच चालू होतील व सध्या एक संच चालू आहे.

No comments:

Post a Comment