Saturday, February 13, 2021

जालण्याच्या जवळ अपघात चारचाकी विहिरीत पडून दोन ठार ! बीडच्या तरुणांचा समावेश !!


बीड येथील सागर गॅरेजचे मालक स्व मोहम्मद सगीर यांचा मुलगा आणि त्याचे मित्र जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी सायंकाळी गेले होते .जालना चिखली रस्त्यावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली .

यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून यात हे दोघे जण हे बीड शहरातील शाहू नगर भागातील असल्याची माहिती आहे .विहिरीत पाणी खूप असल्याने गाडी अद्याप काढण्यात यश आले नसून केवळ एका जणांचा मृतदेह काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

या घटनेमुळे शाहू नगर भागातील बागवान गल्ली आणि परिसरावर शोककळा पसरली आहे .

No comments:

Post a Comment