Monday, February 22, 2021

बीड तालुक्यात सहाशे पाच घरकुल मंजूर.पात्र ठरलेल्यानी लाच देऊ नका.- अॕड अजित देशमुख .



* तर एकशे त्र्याहत्तर अर्ज अपात्र.

बीड – बीड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन दोन २०२०/२१ या वर्षामध्ये सहाशे पाच घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या कारणांनी सध्या अपात्र ठरलेल्या अर्जदारांच्या अर्जाची संख्या एकशे त्र्याहत्तर एवढी आहे. घरकुलाची ही योजना शासनाची योजना आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची लाच देण्याची गरज नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कोणालाही लाच देऊ नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२०/२१ या कालावधीसाठी ही घरकुले मंजूर झाली आहेत. ज्या लोकांना ही घरकुले मंजूर झालेली आहेत, त्यांनी आपले काम पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

मंजूर घरकुल पैकी काळेगाव – ४३, ढेकनमोहा – ४२, कुकडगाव – ३९, बेलूरा – २४,तांदळवाडी घाट – १९, पालसिंगण – १९, साखरे बोरगाव – १८, उंबरद जहांगीर – १८, महिंद्रा – २०, करचुंडी – १६, याप्रमाणे या नऊ गावात २४० इतकी घरकुल मंजूर झालेले आहेत. या गावांना जास्त प्रमाणात लाभ मिळालेला आहे.

त्याखालोखाल अंथरवण पिंपरी – १४, करझनी – १०,खंडाळा – ८, कोळवडी – ८, लोणी शहाजनपुर – ११, मांजरसुंबा – १०, केसापुरी (परभणी) – १३, पाटोदा (बेलखंडी) ८, राजुरी – १२, पिंपळनेर – १२, पेडगाव – १२, उंबरज (खालसा) १०, याप्रमाणे घरकुल मंजूर झालेले आहेत.

No comments:

Post a Comment