Thursday, February 4, 2021

क्षीरसागर यांच्या शिवसेना नगरसेवकांचा थेट पालकमंत्र्यांना इशारा !


twitter sharing button
whatsapp sharing button

बीड (प्रतिनीधी)- नगर पालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यावरील कारवाईचे राजकीय पडसाद उमटू लागले असून डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या गटातील दोन नगरसेवकांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आ संदिप क्षीरसागर यांनाच इशारा दिला आहे .राज्यात सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष बीडमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे,त्यातूनच दोन नगरसेवकांनी थेट पालकमंत्री यांनाच इशारा दिल्याने वेगळी चर्चा होत आहे 

बीड नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून अनेक विकासाची कामे सुरू आहेत आणि ही कामे पारदर्शकपणे होत असताना डीपीडीसीच्या बैठकीत जाणीवपूर्वक खोडा घालून नगरपालिकेची कामे इतर ठिकाणी हस्तांतरित करण्याचा विरोधकांचा डाव असून पालकमंत्र्यांनी याची शहानिशा करून आणि खात्री करूनच घ्यायला हवी नपच्या कामात खोडा घालण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा नगरसेवक ऍड विकास जोगदंड भास्कर जाधव यांनी दिला आहे

बीड नगरपालिकेच्या विकास कामाचा चढता आलेख लक्षात घेऊन विरोधकांनी आता विविध डावपेच खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कालच्या नियोजन समितीच्या बैठकीत जाणीवपूर्वक मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांना बाहेर काढून नगरपालिकेच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे चांगले काम करणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो हे बीड जिल्ह्यात नवीन उदाहरण नाही बैठकीतून अधिकाऱ्याला बाहेर काढण्यात कोणती फुशारकी वाटली हे मात्र समजू शकले नाही बीड नगरपालिकेच्या माध्यमातून शहर विकासाची कामे जोमात सुरू आहेत नेमका हाच मुद्दा विरोधकांना कापला नाही नगरपालिकेला दिला जाणारा निधी थांबवण्याचे षड्यंत्र विरोधकांनी सुरू केले आहेत पालकमंत्र्यांनी याची शहानिशा व खात्री करूनच दखल घ्यायला हवी होती मात्र पालकमंत्री राष्ट्रवादीचे व तक्रार करणारे आमदार राष्ट्रवादीचे असल्याने हा प्रकार झाल्याचे आता उघड झाले आहे विकासकामे पारदर्शकपणे होत असताना डीपीडीसी तून जाणीपूर्वक तक्रार दाखल करण्याचा उद्देश काय या पद्धतीने नगरपालिकेला टार्गेट करून कामे थांबवण्याचे षडयंत्र रचले जात असेल तर त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे
विशेष म्हणजे बीड नगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे व राज्यात कॅबिनेट मंत्री देखील शिवसेनेचे आहेत ज्या खात्याचे मंत्री शिवसेनेचे त्याच खात्याची नगरपालिका असल्यामुळे विरोधक नेमके काय सिद्ध करू इच्छित आहेत हे लवकरच उघड होईल नगरपालिकेच्या चालू कामात खोडा घालून ही विकास कामे बांधकाम विभागाकडे वर्ग करून घ्यायचे व त्यात टक्केवारी काढायची हा तर डाव नाही ना? असाही संशय आता व्यक्त होऊ लागला आहे नगरपालिकेच्या कामात खोडा घालण्याचा विरोधकांनी प्रयत्न करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिले जाईल असा इशारा नगरपालिकेचे नगरसेवक विकास जोगदंड भास्कर जाधव यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment