परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
येथील प्रसिद्ध व्यापारी कृष्णा विष्णुपंत चौलवार यांचे आज शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
शहरातील गांधी मार्केट येथील रहिवासी तथा ललिता मेडिकलचे संचालक कृष्ण विष्णुपंत चौलवार यांचे आज शुक्रवारी पहाटे 3.30 वा. अल्पशा आजाराने निधन झाले.कृष्णाचा चौलवार हे अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी तसेच धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने सर्वत्र सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, चार मुली ,एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश, ज्ञानेश्वर, बालाजी यांचे ज्येष्ठ बंधू होत.कृष्णा चौलवार यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरी गांधी मार्केट येथून अंत्ययात्रा निघणार आहे.कांतीकारी साथी परिवार त्यांच्या दुःखत सहभागी आहे.
No comments:
Post a Comment