नवी दिल्ली -; गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरुवातीच्या दिवसांमध्ये हवामान बदलणार असून, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत पाऊस पडणार आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संथ्या असलेल्या स्कायमेट वेदरचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश पालावल यांनी सांगितले की, १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान देशातील काही राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाला आम्ही अवकाळी पाऊस असेच संबोधणार आहोत. या अवकाळी पावसाचा फटका, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगाणा आणि तामिळनाडूला बसणार आहे. या राज्यांमध्ये १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडू शकतो, असे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment