परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-विहिरीचे बील काढण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीमधील कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले.विशेष बाब म्हणजे ही कारवाई पंचायत समिती कार्यालयातच झाल्याची चर्चा आहे. लाचखोर अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने पकडल्याने परळी येथील शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील एका शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विहिर मंजूर झाली होती. विहिरीचे बील काढण्यासाठी पंचायत समिती विभागातील कृषीचे विस्तार अधिकारी संजय पालेकर लाचेची मागणी करत असे. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता.मंगळवार दि 22 रोजी दुपारच्या सत्रात सापळा रचून लाचलुचपत विभागाने विस्तार अधिकारी संजय पालेकर यास 4 हजार रुपयांची लाच घेताना पंचायत समिती कार्यालयात रंगे हात पकडले. ही कारवाई बीड एसीबीचे रविंद्र परदेशी व त्यांच्या टीमने केली आहे.
No comments:
Post a Comment