रस्ते कामासंदर्भात अवैध मुरूम उपसा करणे कंपनीला भोवले सुमारे 40 लाख रुपये पर्यंतचा दंड कंपनीला बसला आहे शिरूर कासार तालुक्यातील चिंचपूर राजुरी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या अवैध मुरूम उपसाप्रकरणी ड्रीम कंपनीला ४० लाख रुपये दंड करण्यात आला आहे
शिरूर कासार तालुक्यात चिंचपूर-राजुरी रस्त्याच्या कामासाठी ड्रीम कंपनीचे टिप्पर तालुक्यातील वारणी येथून बेकायदेशीर मुरूम उपसा करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी अमोल खेडकर आणि तलाठी सीमा रुद्रे यांनी जागेवर जाऊन कारवाई केली. यावेळी संबंधित कंपनीने मुरुमाची रॉयल्टी भरली नसल्याचे दिसून आले. त्यानुसार तीन हायवांवर कारवाईसाठी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे पंचनामा करून प्रस्ताव पाठवला. त्यानुसार ड्रीम कंपनीला ३९ लाख रुपये रॉयल्टीपोटी आणि तीन हायवांवरील कारवाईपोटी ३ लाख असा सुमारे जवळपास ४२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. अशी माहिती तहसीलदार बेंडे यांनी दिली आहे
No comments:
Post a Comment