Sunday, February 20, 2022

बिंदुसरा नदीवरील अतिक्रमण हाटविण्यासाठी आम आदमी पार्टी नदीत धरणे आंदोलन करणार.

* असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष  अशोक येडे  यांनी दिला आहे

 बीड  (प्रतिनिधी) बीड शहरांमधून वाहत असणारी बिंदुसरा नदीमध्ये भूमाफिया व जनप्रतिनिधी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बिंदुसरा नदीमध्ये संपूर्ण रॉ मटेरियल टाकून अतिक्रमण होत आहे. थांबवण्यात यावे आज आम आदमी पार्टी बिंदुसरा नदीच्या कडेला जनतेचे लाखो करोडो रुपये खर्च करून एक आमदार फंडातून समशानभूमी बांधण्यात आली परंतु ते समशान भूमी सर्वसामान्य नागरिकांच्या वापरात न येता फक्त आणि फक्त गुत्तेदार पोहोचण्यासाठीच बांधण्यात आली वापर  याचीदेखील चौकशी झाली पाहिजे व संबंधित अधिकाऱ्यांवर व संबंधित व्यक्तींवर ती कारवाई झाली पाहिजे बीड शहरामध्ये वारंवार आंदोलने करून निवेदने देऊन मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामे निवडणुकीच्या तोंडावर  होत आहेत ते फक्त आणि फक्त गुत्तेदार पोसण्याचं काम चालू आहे एकही काम नियमा प्रमाणे होताना दिसत नाही व त्याच्या वरती कोणीही इंजिनीयर अभियंता क्वालिटीची देख रेख करताना दिसले नाहीत सर्व जनतेचा पैसा लुटण्याचे काम चालू आहे या सर्व मुद्द्यांना घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये बिंदुसरा नदी पात्रांमध्ये उतरून धरणे आंदोलने करणार यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे,  शहराध्यक्ष सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, कैलाश चंद पालीवाल, योगेश पवळ, अभिषेक टाळके, इत्यादी उपस्थित होते

No comments:

Post a Comment