बीड (प्रतिनिधी) राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा पंधरावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री.व्यंकटेश चामनर साहेब पंचायत समिती सदस्य अंबाजोगाई,व रखमाजी सावंत साहेब पंचायत समिती सदस्य अंबाजोगाई,यांच्या शुभहस्ते करण्यात आले व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन मा श्री. सोडगिर साहेब, व मा श्री.वसंत शिंपले सरपंच यांच्या शुभहस्ते करण्यात आले*
आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास संबोधित करताना मा.व्यंकटेश चामनर साहेब म्हणाले धनगर समाजाने स्वतः चे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी संघटीतपणे लढा देण्याची गरज आहे,हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल अभिनंदन आपन आपल्या दैवताचा आदर केला पाहिजे या उपक्रमातुन समाज एकत्र येतो यातुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे आपन सर्वांनी दर रविवार उपस्थित राहुन अभिवादन केले पाहिजे*
अभिवादन सभा प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सुरू केली त्याचा लाभ समाजाने घेतला पाहिजे दर रविवारी आपले दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपन सर्वांनी अभिवादन केलेच पाहिजे असे मा.सोडगिर साहेब यांनी सांगितले.
यावेळी महादेव गावडे , हजारे ग्रामसेवक साहेब,सुर्यकांत कोकाटे, पत्रकार महानोर साहेब,तांबे सर,काळे रोहीत साहेब, महादेव राहींज सर,पवन गावडे ता अध्यक्ष, महानोर साहेब, सोमनाथ लंबाटे, ढवळे बाळासाहेब, सतिश लंबाटे साहेब, ढवण सर, विठ्ठल कोकाटे सर, चादर सर,सूधाकर वैध साहेब,प्रविण उघडे, महादेव राहींज राजुरी ,काकासाहेब कानाडे, भोसले सर, माऊली मारकड , ढवण भैय्या, अमोल गावडे, दिपक मदने,ढवळे भैय्या,आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पूजन अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे
No comments:
Post a Comment