Thursday, February 24, 2022

अवैध गर्भपात प्रकरण डाॅ.सुदाम जात्यात तर डाॅ.अशोक सुपात. कायदा सगळ्यांना समान का नाही ?


____
बीड जिल्ह्य़ातील गाजलेल्या अवैध गर्भपातातील प्रकरणापैकी दोन प्रकरण राज्यभर गाजली त्यात डाॅ.सुदाम यांना जेल झाली तर अगदी तशाच प्रकारचे गुन्हे दाखल असलेले डाॅ.अशोक मात्र आपल्या २० वर्षातील प्रदीर्घ राजकीय नेत्यांशी हितसंबंध, मंत्र्याचा विशेष आधिकारी राहील्याने जिल्हाशल्यचिकित्सक पदावर अजुनही कार्यरत आहे. डाॅ.सुदाम यांना जर राजकीय वरदहस्त असता तर ते आज जेलमध्ये नसते एखाद्या ठिकाणी जिल्हाशल्यचिकित्सक पदावर काम करत असते. 

डाॅ.सुदाम यांना अरेरावी व सरकारी कामात अडथळा म्हणून शिक्षा मात्र डाॅ.अशोक यांना गुन्हा माफ 
____
डाॅ.सुदाम यांनी तपासणी आधिका-यांना अरेरावी करत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांना शिक्षा झाली अशी आजच दैनिकात बातमी प्रसिद्ध झाली...
      परंतु डाॅ.अशोक यांनी त्यांना जेव्हा अवैध गर्भपातातील प्रकरणात अटक करण्यात आली होती तेव्हा चौकशी समितीतील सदस्यांनी  तत्कालीन जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना 
"डाॅ.अशोक व त्यांच्या ४-५
_________________________
 समर्थकांकडुन वारंवार जिल्हा
_____________________________
 रूग्णालयात येऊन चौकशी समिती
___________________________
 सदस्यांना व प्रशासनातील ईतर
_____________________________
 कर्मचा-यांना धमकी देणे, दबाव
___________________________
 टाकणे, शिविगाळ करणे, धुडगुस
_____________________________
 घालणे ईत्यादी प्रकार सातत्याने चालु
_____________________________
 आहेत तरी आपल्या स्तरावरून असे
____________________________
 प्रकार थांबविणे यासाठी आपण
___________________________
 जिल्हाधिकारी यांना विनंती करावी "
_____________________________
   अशी लेखी तक्रार ४ चौकशी समितीतील सदस्यांनी केली होती;परंतु राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झालीच नाही. 

 उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अवैध गर्भपातातील गुन्हेगार ठरवलेल्या डाॅ.अशोक यांना त्याच आरोपातील डाॅ.सुदाम यांच्यावर कारवाईचा आधिकार आहे काय???
_____
डाॅ.सुदाम आणि डाॅ.अशोक दोघांवरही अवैध गर्भपातातील गुन्हेगार म्हणून सारखीच कलम लागु आहेत त्यात डाॅ.अशोक यांनी आपल्यावरील गुन्हे रद्दबातल करण्यात यावेत यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हे कायम केलेले आहेत.तरीही ताईंचा राजकीय वरदहस्त असल्याने ते केज वैद्यकीय अधिक्षक पदावरून जिल्हाशल्यचिकित्सक बीड पदावर बढती झाली आणि ज्या गुन्ह्यात डाॅ.सुदाम आहेत त्यात गुन्ह्यामधील कलम डाॅ.अशोक यांच्यावर आहेत, तसं पाहीलं तर पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाशल्यचिकित्सक यांची असते परंतु अवैध गर्भपातातील गुन्हेगार जर जिल्हाशल्यचिकित्सक पदी असेल तर मग कायदा कसा राबवणार??? आणि त्यांना ईतरांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार आहे काय??

मुलींचा दर कमी म्हणून ताईंना चिंता मात्र अवैध गर्भपातातील गुन्हेगाराला जिल्हाशल्यचिकित्सक पदावर नेमताना ताई हे कसं  सोयीस्कर विसरल्या ???
______
गेल्या आठवड्यात डाॅ.आशा मिरगे यांनी पत्रकार परीषदेत बीड जिल्ह्य़ातील मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे जाहीर करताच ताईंनी लगेचच चिंता प्रकट करत बीड जिल्ह्य़ात वचकच राहीला नाही म्हणून प्रतिक्रीया दिली परंतु याच ताई पालकमंत्री असताना त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अवैध गर्भपातातील गुन्हेगार कायम केलेल्या डाॅ.अशोक यांना केज वैद्यकीय अधिक्षक पदावरून जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड पदावर नियुक्त केले केवळ राजकीय फायद्यासाठी त्यामुळेच ताईंची चिंता हे केवळ राजकीय लाभासाठी भाऊंवर टीका करायची म्हणून टीपन्नी आहे तिला नैतिक अधिष्ठान नाही. 

डाॅ.सुदाम जात्यात तर डाॅ.अशोक सुपात ;न्यायधीशाची दिशाभूल 
____
डाॅ.अशोक यांनी स्वतःवरील केज न्यायालयात दाखल गुन्हे प्रकरणात दबाव आणण्यासाठी स्वतःचा जिल्हान्यायधीशाच्या हस्ते सत्कार घडवुन आला आणि विशेष म्हणजे न्यायधीशांची दिशाभूल केली कारण न्यायाधीशांना गुन्हेगाराचा सत्कार करण्याचा प्रोटोकाल नसतोच, त्यामुळेच भविष्यात जिल्हा न्यायधीश यांना सुद्धा अडचणीत आणले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणारच, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि अखेर ५ वर्षापासून केज न्यायालयात हजर न राहणा-या डाॅ.अशोक यांना नाॅनबेलेबल वाॅरंट काढल्यानंतर शेवटी गेल्या महिन्यात ते हजर झाले आणि केज न्यायालयाने कमीटल ऑर्डर म्हणजेच अंबाजोगाई सेशन कोर्टात दोषारोपपत्र पाठवले आणि येत्या  २ मार्च २०२२ ला  तारीख आहे,म्हणूनच डाॅ.सुदाम जात्यात तर डाॅ.अशोक सुपात आहे.....

No comments:

Post a Comment