Wednesday, February 16, 2022

बीड जिल्हा रूग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांचे आदेशाने चौकशी .


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्हा रूग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात मोठ्याप्रमाणात आर्थिक उलाढाल रूग्णालयातील वरिष्ठ आधिकारी-कर्मचारी, औषध भांडार प्रमुख आदिंच्या संगनमतानेच झाली असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांना केल्यानंतर सहसंचालक (अता)राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी जिल्हाधिकारी बीड, जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड, यांना दि.२१ जुन २०२१ रोजी संबधित प्रकरणात चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेशित केले होते परंतु त्याची चौकशी करण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आले होते. 

जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुर्यकांत गिते, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुखदेव राठोड, औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंढे आदिंची चौकशी 
___
जिल्हा रूग्णालयातील रेमडीसिवीर इंजेक्शन मर्जीतील खाजगी हाॅस्पिटल मध्ये  आस्तित्वातच नसलेल्या रूग्णांच्यानावे रेमडीसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आल्याचा प्रकार आढळून आला होता या प्रकरणात तक्रारदार दिपक इंदर थोरात यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी दिपक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुखदेव राठोड यांच्या दालनासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्यानंतर संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी दिपक थोरात यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते, त्यांना पाठींबा देण्यात आला होता. 

चौकशी करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्याचाच प्रयत्न;भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण 
____
बीड जिल्हा आरोग्य विभागातील रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून सहसंचालक (अता)राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई महेश बोटले यांनी जिल्हाधिकारी बीड यांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु जिल्हाशल्यचिकित्सक व उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांनी टाळाटाळ केली म्हणून त्यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार केल्यानंतर शेवटी सहाय्यक संचालक (हि)आरोग्य सेवा  लातूर डाॅ.दुधाळ के.एच यांनी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांच्या आदेशावरून जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांना संबधित आधिकारी,कर्मचारी, यांना व तक्रारदार डाॅ.गणेश ढवळे यांना दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांच्या दालनात उपलब्ध पुराव्यासह हजर राहण्याचे सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment