Thursday, February 17, 2022

सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने परळी भुषण रानबा गायकवाड,व वैजनाथ गायकवाड यांचा सत्कार संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने थोर क्रांतिकारक लहुजी साळवे वस्ताद यांची पुण्यतिथी सिद्धार्थनगर येथील त्रिशरण बुद्ध विहारात साजरी करण्यात आली.
 यावेळी ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी ताटे यांच्या हस्ते शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
 तसेच ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी  ताटे, माजी नगर सेवक महेंद्र रोडे, सुभाष सावंत ज्ञानोबा मस्के सर, पत्रकार रानबा गायकवाड पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच दैनिक सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार रानबा गायकवाड यांना दैनिक मराठवाडा साथी चा परळी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर  प्रिस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी RHTC न्यूज चैनल चे मुख्य संपादक वैजनाथ गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल समस्त सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने शाल  पुष्पहार व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
 गेल्या अनेक दिवसांपासून समस्त मित्र परिवाराच्या वतीने  मोठ्या प्रमाणात सत्कार व सन्मान होत आहे परंतु  सिद्धार्थ नगर येथील मित्र परिवाराच्या वतीने केलेला सत्कार व सन्मान हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण असून घरातील परिवाराने केलेला सन्मान सर्वोच्च व अनमोल असल्याची भावना यावेळी पत्रकार रानबा गायकवाड व पत्रकार वैजनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
 अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताटे, माजी नगरसेवक महेद्र रोडे, सुभाष सावंत, राजकुमार हजारे, अशोक पोटभरे, अनिल कांबळे, संजय व्हावले, बालाजी मस्के, बाबुराव कसबे , अमर तरकसे, यांच्यासह बहुसंख्य मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
   सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताटे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार ज्ञानोबा मस्के सर यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment