Saturday, February 19, 2022

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात छञपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.




* संशोधन मार्गदर्शक म्हणुन निवड झालेल्या डॉ.आशा बोबडे यांचा प्राचार्य डॉ.फावडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न.


केज (प्रतिनिधी)   केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात आज छ.शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाली. शिव प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.सी.बी.इंगळे व अधिक्षक पी.एस.भोसले हे होते.
या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत संशोधन मार्गदर्शक म्हणुन नुकतीच निवड झालेल्या ग्रंथालय प्रमुख डॉ.आशाताई बोबडे यांचा सत्कार प्राचार्य डॉ.फावडे ,डॉ.काशिद , डॉ.माने ,डॉ.हिरवे ,पी.एस.भोसले यांच्या हस्ते करण्यात आला
या प्रसंगी धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज या विषयावर डॉ.सी.बी.इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांनी दुरदृष्टी वापरुन आरमार विषयी नव्या धोरणांचा अवलंब करुन सिंधुदुर्ग किल्ला बांधला असे ही सांगितले. अध्यक्षिय समारोप प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे यांनी केला. या कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ.रामेश्वर सोळंके यांनी केले तर आभार डॉ.आशा बोबडे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment