Tuesday, February 15, 2022

केजमध्ये विजयी मिरवणूक आली आंगलट . नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह अनेकांवर गुन्हे नोंद.


केज (प्रतिनिधी)  केजमधे काल नूतन पदाधिकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली , जिल्ह्यात जमावबंदी आदेश असताना मिरवणूक काढून तो मोडल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे .

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे . राज्यातील नगर पंचायत नगराध्यक्ष अन उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक झाली . यामध्ये बीड जिल्ह्यातील केजच्या नगराध्यक्ष पदी जनविकास आघाडीच्या सिताताई बन्सोड यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदी शीतल दांगट यांचीही बिनविरोध निवड झाली आहे .

  नूतन पदाधिकारी यांची त्यानंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली . जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत.मिरवणूक , मोर्चे आंदोलन याला बंदी आहे . मात्र केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली 

No comments:

Post a Comment