Wednesday, February 23, 2022

विरोधकाची रात्रीची झोप उडाली अभिजित प्रभाकरराव कुडे नागरी– माढेली जि.प. सर्कल मधून होत आहे सक्रिय.


अभिजित कुडे हे सामजिक संघटनेत काम करत असताना समाजकार्याला कुठेतरी  राजकारणाची जोड देत  त्यानी गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपल्या कार्य कौशल्य व संघटन कौशल्यच्या जोरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष दिलीप पद मिळविले . वेळोवेळी शेतकरी, अपंग, विद्यार्थि , कामगार, रस्त्याने, सर्व सामान्य माणसाचे प्रश्न आपल्या शांत स्वभावाने व तरुण सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लावून धरले. मग शेतकऱ्यांचे विज पुरवठा खंडीत झाला त्या बद्दल असो, ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावा, रस्त्याने वेगळे वेगळे आंदोलन, अपंग निधी प्राप्त करून देण्यासाठी आंदोलन असो , निराधार योजना, विविध स्पर्धा आयोजित केल्या, रक्ताची गरज असो, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली. कोरोना काळात गरजूंना धान्य वाटप, घरकुल योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड , अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यासाठी वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू असते, विशेष शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. यश– अपयश पदरी पडत गेले या प्रामाणिक हेतूने समाजहिताचे कार्य सूरू आहे शिवाय अभिजित चे शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे व  त्यांचे ग्रामीण भागात दांडगा संपर्क आहे अस बोलले जात आहे.
सध्याचं राजकीय वातावरण बघता या तरुण चेहऱ्याला कितपत पसंदी मिळतेहे बघणे अधिक सार्थ ठरणार आहे . आगामी जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे एक युवा, निष्कलंक व तडफदार नेतृत्व म्हणुन बघितले जात आहे. अभिजित ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे. त्यांनी या आधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे त्याच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आले.
दिग्गज नेत्यांच्या विरोधात एक तरुण असे चित्र या भागात तयार झाले आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेलं हे घराणेशाही, व भागाचा रखडलेला विकास करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला अस ते सांगत होते. या भागातील प्रश्नांना घेऊन अभिजित नी अनेक आंदोलन केलं , केसेस दाखल झाल्या एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी धडपड करत असतो. लोकांनी साथ दिली तर नक्कीच या भागाचा कायापालट होणार असे  अभिजित कुडे नेहमी सांगत असतात . ज्यांनी कधी एक केलें नाही कधी लोकांचे प्रश्न सोडविले नाही फक्तं पैश्याच्या जोरावर निवडणुकीत उतरणार आहे त्यांना अभिजित च्या उमेदवारी मुळे जबर धक्का बसला आहे. अतिशय कमी काळात च अभिजीतने  ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन केला आहे   .  जिल्हा परिषद निवडणुकीत अभिजीत चे नाव चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर सर्व सामान्य माणसाची अभिजित ने ही निवडणूक लढवावी अशी इच्छा आहे .



No comments:

Post a Comment