Sunday, February 20, 2022

पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँकेत छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँकेत उत्साहात साजरी करण्यात आली.

आज शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी परळी शहरातील अल्पावधीत नावाजलेली पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँकेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील, सचिव गोविंदराव भरबडे,  संचालक बालासाहेब पोरे, प्रल्हाद काळे, गोविंदराव मुंडे,म आरफोदीन तांबोळी,मयुर जिरगे, रामेश्वर भोसले, ज्ञानेश्वर सातपुते, सचिन भरबडे,गोविंद उदावंत, सोनाली वैराळे, वैजयंतीमाला घवले, विनायक राठोड,अजय जोशी,प्रशांत कोपरे, कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे, सत्यप्रकाश कराड, निलेश पुजारी,मयुरी शिंदे, पल्लवी स्वामी,शुभम,यांच्या सह सर्व संचालक मंडळ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment