गेवराई - (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये गुटखा माफियांनी उच्छाद मांडला असून, गुरूवारी ता. 17 रोजी अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने अतिक्रमण करून गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या सलेक्ट पान सेंटर सह अन्य चार टपऱ्यांवर छापा टाकून धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली असून टपऱ्यांवर अवैध धंदे करणारे भयभीत झाले आहेत.गेवराई शहरातील काही टपऱ्यांवर अवैध गुटखा विक्री केली जात होती. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी करून ही स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, त्या टपऱ्यांवर कार्यरत करीत नव्हते. मात्र, गुरूवार ता. 17 रोजी दुपारी दोन वाजता बीड व औरंगाबाद येथील अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने अचानक धाडसत्र सुरू करून, अवैध धंदे करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. शहरातील सलेक्ट पान सेंटर सह चार टपऱ्यावर छापा टाकून धडक कारवाई केली आहे. यामध्ये, गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण करून गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या सलेक्ट पान सेंटर सह अन्य चार टपऱ्यांवर छापा टाकला आहे.या कारवाईने अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत.जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाची कार्यवाही
आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी२१ किरणा दुकान व पान टपरी चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यामध्ये एकूण 7800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील कारवाई अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक मारुती माने , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बासर, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या विभागीय व्यवस्थापक भाग्यश्री राठोड , आरोग्य विभागाचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दामोदर व वाहन चालक बापूराव माने यांनी कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment